कोरोना काळात व्यापाऱ्यांना फटका:अनेक व्यापारी देवाणघेवाणीत अडचणीत
गेल्या सहा महिन्यांपासून लहान आणि मोठ्या व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार अडचणीत आले आहेत,दुकान भाडे,नौकर पगार,लाईट बील आणि बँकांचे व्याज यामुळे प्रत्येक व्यापारी मेटाकुटीला आहे बाजारात अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने अनेक व्यापारी देण्याघेण्याच्या व्यवहारात त्रस्त झालेले दिसत आहेत कंपन्या बंद असल्याने नवा माल मिळणे अवघड झाले आहे तर जुना असलेला माल बेभाव विकावा लागत आहे त्यामुळे सगळीकडूनच व्यापारी कोंडीत सापडल्याचे चित्र बाजारात दिसू लागले आहे
कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील जवळपास पावणे दोन कोटी दुकाने बंद होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याची अशी भीती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केलेल्या एका सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.
देशातील किरकोळ व्यापारी संघटित आहेत. पण या क्षेत्राची गणना असंघटित क्षेत्र म्हणून केली आहे. या व्यवसायात देशात जवळपास ७ कोटी व्यावसायिकांचा समावेश आहे
शिवाय या माध्यमातून ४० कोटी जणांना रोजगार प्रदान केला असून ६० लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय करतात. भारतात या माध्यमातून जवळपास ८ हजारांपेक्षा अधिक मुख्य वस्तूंचा व्यवसाय केला जातो. त्यानंतरही बँका या क्षेत्राला औपचारिकरीत्या आर्थिक मदत करण्यास अपयशी ठरल्या आहेत.
केवळ ७ टक्के लहान व्यावसायिकांना बँकांनी मदत केली आहे उर्वरित ९३ टक्के व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहेत. देशातील १.७५ कोटी दुकाने बंद झाली तर त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची ठरणार आहे.
त्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढले आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीत सापडली असून या व्यावसायिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना समर्थन पॅकेज जाहीर करण्याची मागणी कॅटने केली आहे.