बीड

बीड जिल्ह्यात 110 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात गुरुवारी (दि.10) जिल्ह्यात 110 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 750 स्वॅब तपासण्यात आले. यात 640 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 110अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यात सर्वाधिक 24 बाधीत रूग्ण अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी तालुक्यात 2, बीड 20, धारूर 9, गेवराई 6, केज 3, परळी 18, पाटोदा 4,माजलगाव 14, शिरूर 5 आणि वडवणी 5, रूग्णांचा समावेश आहे.