बीड

बीड जिल्ह्यात 74 जणांची कोरोनावर मात तर 95 पॉझिटिव्हची भर

आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 95 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर आजच 74 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 1047 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत

बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 4800 झाला असून आतापर्यंत 3624 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 129 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे

आत्तापर्यंत 65051 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 60251 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 74.10 इतका असून एकूण संख्येच्या 7.8 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे त्यामुळे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे