सामान्य नागरिकांना हादरा: घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी रद्द
नवी दिल्ली – कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी केंद्र सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना हादरा बसला आहे. या गॅस सिलिंडरच्या किंमती खुल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या पातळीवर आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अनुदानित गॅस सिलिंडरवरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करून ती बंद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या सबसिडीत सरकारने कपात केली होती. त्यानंतर गेल्या ४ महिन्यांपासून ही सबसिडी बंद केली आहे.
त्यामुळे गॅस सिलिंडरच्या सबसिडीचे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. अनुदानित आणि विनाअनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ५९४ इतकी झाली आहे. या दोन्ही गॅस सिलिंडरच्या दरात आता फारशी तफावत राहिलेली नाही. त्यामुळे गॅस सबसिडीची आता गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ती आता रद्द केली आहे.
एलपीजी सिलिंडर अनुदानाची रक्कम खात्यात का येत नाही?
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती बदलल्या तेव्हाच गॅसवरील अनुदान संपविण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे मे, जून आणि जुलैमध्ये गॅस घेतल्यानंतरही ग्राहकांकडून शुल्क आकारले गेले तसेच अनुदानाची रक्कमही खात्यात ट्रान्सफर केली गेली नाही.