बीड

बीड जिल्ह्यात आज 94 कोरोना बाधीत आढळले

जिल्ह्यात रविवारी (दि.30) आणखी 94 कोरोनाबाधीत रूग्ण वाढले असून आज अंबाजोगाई येथे सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या 667 अहवालांपैकी 94 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 4 अहवाल अनिर्णयीत आहेत. उर्वरित 572 व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रविवारी बाधीत निष्पन्न झालेल्या रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12 आष्टी 5, बीड 27, धारूर 7, गेवराई 12, केजमध्ये 2, माजलगाव 11, परळीत 5, शिरूरमध्ये 5 तर वडवणी 4 आणि पाटोद्यात एका रूग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात आता आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 4467 झाली आहे. यापैकी 3248 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 120 रूग्णांचा मृत्यू झाला आहे

.