बीड

जिल्ह्यात 75%रुग्ण बरे झाले:आज 231 पेशंटला सुट्टी मिळणार

उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्या पेशंटची संख्या आता जवळपास तिप्पट झाली आहे
आजही चांगली बातमी आहे 231जण करोनामुक्त रुग्ण घरी जाणार आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे

आज जिल्ह्यात 231 तर एकूण 3248 जण कोरोनामुक्त झाले आहेत

आज रविवारी जिल्ह्यातील 231 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाधीत संख्या 4467 असून 1099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे
उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे ही समाधानाची बाब आहे आत्तापर्यंत बाधीत रुग्णापेक्षा 75 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत मृत्यूचे प्रमाणही आता कमी झाले आहे

error: Content is protected !!