बीड

बीड बाजार समितीचे कामकाज बंद: सर्व कर्मचाऱ्याचा संपात सहभाग

बीड-राज्यातील बाजार समिती कर्मचारी यांना शासनाने सेवेत सामावून घ्यावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून बीड बाजार समिती आज बंद ठेवण्यात आली आहे शासनाने मागण्या मान्य कराव्यात यासाठी सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत

केंद्र शासनाने माहे 5 जुन, 2020 रोजी एकुण तीन नवीन अध्यादेश पारित केलेले आहेत. त्या अध्यादेशानुसार राज्य शासनाने पणन संचालक महाराष्ट्र शासन,पुणे यांचे मार्फत सदर तिन्ही अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुचना राज्यातील सर्व बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. सदर अध्यादेशामंधील तरतुदींनुसार सर्व अन्न-धान्य्, तेलबिया, हे बाजार समितीच्या नियंत्रणातुन मुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न घटणार आहे. तसेच सदर अध्यादेशामुळे शेतक-यांना देशात कुठेही त्यांचा शेतमाल विक्री करु शकणार आहेत व व्यापारी देखील शेतक-यांचा बांधावरुनच शेतमालाची खरेदी करू शकतील. त्यांना बाजार समितीच्या नियंत्रणातुन मुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न निश्चितच घटनार आहे. व त्यामुळे बाजार समित्यांना शेतकरी सुविधा उपलब्ध करणेसाठी, दैनंदीन खर्च भागविणेसाठी, कर्मचारी वेतनाचा खर्च भागविणेसाठी उत्पन्नाचे नविन स्त्रोत शोधावे लागतील. त्या करिता महाराष्ट्र बाजार समिती सहकारी संघ म. पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व बाजार समित्यांना आज दि.21/08/2020 रोजी सदर अध्यादेश मागे घेण्याबाबत व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी व ईतर राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे कर्मचा-यांना राज्य शासनाचे सेवेत समाविष्ट करुन घेणेसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. व या संपाला महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांनी जाहिर पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे आज बाजार समित्यांनी संप पुकारला असल्यामुळे समितीचे कामकाज बंद आहे व याचा फटका सर्व बाजार घटकांना बसला आहे. सदर अध्यादेशामुळे शेतक-यांचा फायदाच होणार आहे, असे शासनाकडुन सांगण्यात येत आहे. वास्तवात शेतक-यांचा किती व कसा फायदा होईल हे निश्चीत सांगता येणार नाही. आजच्या संपाकरिता बीड बाजार समितीचे सभापती, उपसभापती, व संपुर्ण संचालक मंडळ यांनी पाठिंबा दिलेला आहे.