विद्यार्थी-पालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी लॉकडाऊन मधून सूट-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
इयत्ता दहावीच्या परीक्षेनंतर आता या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून टीसी आणि मार्क मेमो घेऊन त्यांची पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थी व पालक यांना टीसी मार्क मेमो काढण्यासाठी व प्रवेश प्रक्रिया साठी संचार बंदीतून सूट दिली आहे तसेच शाळेतील शिक्षकांना देखील या प्रक्रियेसाठी 24तास शाळेत थांबून काम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे इयत्ता दहावी पास विद्यार्थी पालक हे शाळेमध्ये आल्यानंतर एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करून covid-19 विषयक सामाजिक आंतर पाळणे याबाबत प्रत्येक शाळेने सक्त सूचना द्याव्यात आणि त्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित शाळेने घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
संचार बंदीच्या काळातच प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे दिनांक 11 रोजी काढण्यात आलेला दहा दिवसांकरता सहा शहरातील संचार बंदीचा आदेश या कामासाठी शिथिल करण्यात आला आहे
विद्यार्थी व व त्यांचे पालक यांना सूचना देण्यात आली असून प्रवेश प्रक्रिया साठी किंवा कागदपत्र आणण्यासाठी जाताना शाळेचे ओळखपत्र व पालकांनी आपले आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे