बीड

पाच शहरातील बँकांना दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी; लॉक डाऊन मधून सूट

बीड परळी वैजनाथ अंबाजोगाई आष्टी केज या शहरातील सर्व बँकांना लॉक डाऊन कालावधीमध्ये बँकेचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत असून यासाठी सर्व बँका अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या ओळखपत्राचा वापर करावा त्याच प्रमाणे पोस्ट ऑफिस विभागातील अधिकारी कर्मचारी यांना देखील त्यांचे शासकीय ओळखपत्र द्वारे पोस्टाचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे सर्व घाऊक व्यापारी होलसेलर्स यांना त्यांचा आलेला माल उतरवून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली असून दरील आदेशाची आवज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रविणकुमार धरमकर अपर जिल्हादंडाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी दिले आहेत