बिंदुसरा धरण 98%भरले नदी पात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
माजलगाव धरण दि. 15-08-2020 आजची पाणीपातळी = 430.42 मी. एकूण साठा 353.20 दलघमी,उपयुक्त साठा 211.20 दलघमी,उपयुक्त साठा टक्केवारी 67.69 % इतका झाला असून पाली येथील बिंदुसरा धरण 98%भरले आहे पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे
बीड शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण तसेच माजलगाव येथील धरण पूर्ण भरले आहे पाली येथील धरणाची पातळी 98 टक्के भरली असून अजून जर पाऊस झाला तर धरण ओव्हर फ्लो होऊ शकते त्यामुळे बीड शहरातील नदी काठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करावे व सतर्क राहावे माजलगाव धरण देखील 68% क्षमतेने भरले असून दि. 15-08-2020 आजची पाणीपातळी = 430.42 मी. एकूण साठा 353.20 दलघमी,उपयुक्त साठा 211.20 दलघमी,उपयुक्त साठा टक्केवारी 67.69 % इतका झाला आहे तरी सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी कळविले आहे