भारताव्यतिरिक्त अन्य चार देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतात.
नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळून आता 72 वर्ष पूर्ण होतील. भारताव्यतिरिक्त अन्य चार देश आहेत जे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतात.
दक्षिण कोरिया, कांगो, बहरीन, लिकटेंस्टीन हे देश आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या दिवशी साजरा करतात. या चार देशांना ही 15 ऑगस्ट या दिवशीच स्वातंत्र्य मिळालं होतं.
दक्षिण कोरिया जपानकडून 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतंं. फ्रान्सने कांगो या देशाला 15 ऑगस्ट 1960 रोजी स्वातंत्र्य केलं होतं. बहरीन या देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं होतं.
तसेच 15 ऑगस्ट 1866 रोजी लिकटेंस्टीन या देशाला जर्मनीकडून स्वातंत्र्य मिळालं होतं.