देशभरात कोरोना लस वितरित करण्याचं प्लॅनिंग देखील तयार-पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी विकासाच्या नव्या युगाला पुढे नेत आहेत. मी त्या सर्व सरपंचांचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या निदर्शनाखाली जम्मू काश्मीरला पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये नैसर्गिक साधनांची कमतरता नाही, तेथील लोकांमध्ये क्षमता आहेत.
- कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जाईल. लस तयार झाल्यावर देशभरात वितरित करण्याचं प्लॅनिंग देखील तयार आहे.
- देशाच्या आरोग्य क्षेत्रात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात आहे. ही भारतात मोठी क्रांती करेल. उपचारात खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी भारतातील प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यात त्या नागरिकाच्या आरोग्याची सर्व माहिती त्या कार्डात असेल. या मिशनमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्यांना उपचार घेणं सोप होणार आहे.
- आपल्या देशात कोरोनाच्या आधी केवळ एक प्रयोगशाळा होती. आता 1400 पेक्षा अधिक प्रयोगशाळा आहेत. 300 पासून 7 लाख कोरोना चाचणीपर्यंतचा टप्पा भारताने गाढला आहे. 5 वर्षात 35 हजार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी तयार झाल्या.
- कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार
- राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन आजपासून, प्रत्येकाला ओळखपत्र मिळणार, तुमचे आजार, औषधे, डॉक्टरांनी केलेलं निदान याची माहिती एकाच कार्डवर
- मुलींच्या लग्नाचं वय किती असावं याबाबत विशेष समिती तयार करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांच्या वयाबाबतही निर्णय घेतला जाईल.
- भारतात महिला शक्तीला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचं नावं रोषण केलं. आज महिला कोळशाच्या खाणीत काम करत आहेत तशाच अवकाशातही काम करत आहेत. गर्भवती महिलांना पगारी 6 महिन्यांची सुट्टी देणं असो, मुस्लीम महिलांना मुक्ती देणं, 40 कोटी जनधन खात्यांमध्ये 22 कोटी खाते महिलांचे. त्यात 30 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनते देखील अधिकाधिक महिलांच्या नावे घर होत आहे.
- सायबरच्या क्षेत्रात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे देशाच्या विकासावर, सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या धोक्यांचा विचार करुन भारत सतर्कतेने नव्या व्यवस्था विकसित करत आहे. नवी सायबर सुरक्षा धोरण तयार केलं जात आहे. येणाऱ्या काळात या सायबर सुरक्षेत सर्वजण सोबत पुढे जाऊ.
- मागील 5 वर्षात दीड लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहचलं आहे. उरलेल्या 1 लाख ग्रामपंचायतींनाही लवकरात लवकर ही व्यवस्था दिली जाईल. सर्व 6 लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सुविधा पोहचवली जाईल. हजारो किलोमीटरपर्यंत हे काम होईल. 1000 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करु.
- देशाच्या विकासात शिक्षणाचं खूप महत्व आहे. त्यामुळेच तीन दशकांनंतर आम्ही देशाला एक नवं शिक्षण धोरण दिलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगात मानाने काम करता येईल. देशात प्रगती होण्यासाठी संशोधनाला फार महत्त्व असतं.
- 25 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करुन मध्यमवर्गांना घरं मिळावी म्हणून काम केलं जात आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल.
- मध्यमवर्गातून निघालेले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, वैज्ञानिक जगभरात आपला डंका वाजवत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपांपासून मुक्ती हवी आहे. त्यासाठी आमचं सरकार सातत्याने काम करत आहे. स्वस्त इंटरनेट, स्वस्त स्मार्टफोन, परवडणारा हवाई प्रवास अशा अनेक गोष्टींमधून आपण मध्यमवर्गासाठी प्रयत्न करत आहोत.
- आज ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्नादन संघ तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवी ताकद मिळेल. मागीलवर्षी जल मिशन योजनेची घोषणा केली. त्यातून देशाच्या प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळायला हवं. त्यासाठी मागील काळात आपण मोठं काम केलं. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक भागात प्रयत्न सुरु आहेत.
- देशात कोणतीही वस्तू कोठेही तयार झाली तर देशातील कुठेही जाऊन विकता येत होती, मात्र भारताच्या शेतकऱ्याला आपला माल इतर ठिकाणी जाऊन विकता येत नव्हता. त्यासाठी आम्ही अनेक कायदे रद्द केले आणि त्यांना मुक्तता दिली. आता भारताचा शेतकरी देखील देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन त्यांच्या शर्तींवर आपला शेतीमाल विकू शकतो.
- गावातील संसाधनांवर विश्वास ठेऊन व्होकल फॉर लोकलवर भर द्यायचा आहे. गावातील लोक दूरदूर कामासाठी बाहेर जातात. मात्र त्यांना आता गावाकडे परतावं लागलं आहे. गावाकडून शहरात कामासाठी येणाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी आम्ही एक मोठी योजना बनवली आहे. त्यामुळे गावाकडून कामाला येणाऱ्यांना सुविधा मिळेल.
- कोरोनाच्या संकटातही कोट्यावधी गरिबांना मोफत गॅस मिळाला. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पोहचवण्यात आलं. 90 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये गरिबांच्या खात्यात पोहचले. कुणाला विश्वासही नव्हता की दिल्लीतील 100 रुपयांपैकी 100 रुपये गावांपर्यंत पोहचतील.
- नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पाची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी 110 लाख कोटी पेक्षा अधिक खर्च केला जाईल. यासाठी विविध क्षेत्रात जवळपास 7 हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. या संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवरकाम केल्याने सर्वच घटकांना फायदा होणार आहे.
- कुणालाच वाटलं नव्हतं लाखो गरिबांच्या खात्यात कोट्यावधी रुपये हस्तातरित होतील, कुणालाच वाटलं नव्हतं शेतकरी, व्यापार, अंतराळ क्षेत्र यात आमुलाग्र बदल होतील. ते झालंय. भारतातील बदलाच्या या काळाला जग बारकाईने पाहतंय. त्यामुळेच परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. मागीलवर्षी एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळातही जगभरातील कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. हे असंच झालेलं नाही. यासाठी भारताने अनेक आमुलाग्र बदल केले आहेत.
- फक्त आयातीवर बंदी घालणं आपला उद्देश नाही. निर्यातक्षमही व्हायचं आहे. भारतात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवं.
- कोरोनाच्या संकटकाळात अनेक गोष्टींसाठी आपल्याला आयात करण्याची वेळ आली मात्र, ते जग देऊ शकलं नाही. त्यावेळी देशात एन95, व्हेटिलेटर आणि अनेक गोष्टी बनायला लागल्या. आज भारत जगात निर्यातही करु शकतो.
- आपल्याला भारतात तयार झालेल्या सामानाची जगभरात वाहवा करायची आहे. एककाळ होता जेव्हा भारताचं असं कौतुक होत होतं.
- एक काळ होता जेव्हा भारताला बाहेरुन गहु आयात करावा लागत होता. मात्र, आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. आज भारत जगाला अन्नधान्य पुरवू शकतो. भारताला जगाच्या अपेक्षांवर उभं राहण्यासाठी कृषी क्षेत्राला चालना द्यावी लागेल. आम्ही कृषी क्षेत्राला कायद्यांच्या कचाट्यातून बाहेर काढलं. अवकाश क्षेत्राला मुक्त केलं त्यात तरुणांना नव्या संधी मिळत आहेत.
- किती दिवस कच्चा माल पाठवून पक्का माल आयात करायचा. आपल्याला कच्चा मालात मुल्यवृद्धी करुन भारताला आत्मनिर्भर करावं लागेल.
- वेदात वसुधैवं कुटुंबकम म्हणत होते तर विनोबा जय जगत म्हणत. हे विश्वच भारतासाठी नेहमी घर राहिलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान वाढवायला हवं. त्यासाठी भारताला स्वतःला सशक्त व्हावं लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपली मुळं मजबूत होतील तेव्हा आपण जगाला देखील मदत करायला पुढे येऊ. आपल्या देशात नैसर्गिक साधनांची कमतरता नाही. त्यामुळे आपल्याला या संसाधनांमध्ये मुल्यवृद्धी करावी लागेल.
- देशाच्या तरुणांमधील महिलांमधील क्षमतेवर विश्वास आहे. भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो. त्यामुळेच आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा जगाला भारताकडून अपेक्षा देखील आहेत. आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी तयारी करायला हवी. युवकांनी भरलेला भारताला आत्मविश्वास कमवावा लागेल.
- कच्चा माल पाठवायचा आणि तयार वस्तू आयात करायची, हे किती वर्ष करत राहणार?
- वयाच्या 25-30 व्या वर्षी आपले कुटुंबीय आत्मनिर्भर व्हायला सांगतात, देश 75 व्या वर्षाच्या दिशेने जात असताना आत्मनिर्भर होणे आवश्यकच
- या सर्व संघर्षातही भारताच्या सुपुतांनी स्वातंत्र्याची चळवळ मजबूत ठेवली. अखेर जगभरात भारताच्या या स्वातंत्र्य चळवळीने जगभरात स्वातंत्र्यासाठी एक प्रेरणा तयार केली. जग भारताच्या या योगदानाला कधी विसरु शकत नाही.
- बापूंच्या नेतृत्वात त्या आंदोलनाने स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा दिली. भारताला आपली संस्कृती, परंपरा याच्यापासून तोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. भारतावर राज्य करणाऱ्यांना वाटत होतं हा देश भाषा, धर्म आणि अनेक स्तरावर विभागलेला आहे. त्यावर राज्य करणं सोपं आहे असं त्यांना वाटत होतं. मात्र त्यांना भारताच्या विविधतेत देखील असलेला एकजीणसीपण माहिती नव्हता. त्यावेळी विस्तारवादाने अनेक प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली घेतले. मात्र, भारताची स्वातंत्र्य चळवळ जगभरात वेगळी ठरली. विस्तारवादाने जगाला दोन महायुद्धांमध्ये झोकलं.
- आपल्या पूर्वजांनी त्याग आणि बलिदानाच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. गुलामगिरीच्या या मोठ्या काळात एकही क्षण किंवा क्षेत्र असं नव्हतं जेथे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झाले नाही. अनेक तरुणांनी आपलं तारुण्य तुरुंगात घालवलं. त्या विरांना नमन करतो.
- यावेळी आपल्याला संकल्प करणं फार महत्त्वाचं आहे. पुढीलवर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करु. त्यामुळे पुढील 2 वर्ष आपल्याला 130 कोटी जनतेसोबत काही महत्त्वाचे संकल्प करायचे आहेत.
- स्वातंत्र्याचं पर्व आपल्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नवे संकल्प करण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.
- कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना देखील मी नमन करतो. कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या कुटुंबीयांना बाधा झाली, काहींना तर आपला जीवही गमवावा लागला त्या सर्वांना मी नमन करतो. मला विश्वास आहे आपण हे कोरोना युद्ध जिंकू. मागील काही काळापासून आपण अनेक संकटांचा सामना करत आहोत. पुराने देखील देशाला फटका बसला आहे. मात्र, आपण या संकटाच्यावेळी सर्व राज्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत पोहचवण्याचं काम केलं जात आहे.
- श्री अरविंद घोष क्रांतीदुतापासून अध्यात्मापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. त्यांचा आज जन्मदिन आहे. आपण एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. आज मला माझ्यासमोर भारताचं भविष्य असलेले लहान मुलं बसलेले दिसत नाहीत. कोरोनाने काही आव्हानं उभी केली आहे
- लहान मुलं यावेळी लाल किल्ल्यावर दिसत नाहीत, कोरोनाने सर्वांची वाट अडवली, ‘सेवा परमो धर्म’ मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना नमन
- सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. या स्वातंत्र्यामागे भारत मातेच्या लाखो लेकरांचा त्याग आहे. त्यांना आज नमन करण्याचा दिवस आहे. आपले सुरक्ष दलाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जो देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतो त्या सर्वांना देखील आज आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे