बीड

कोरोना मुक्तीची हजारी पार;आज 106 जण होणार कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात रुग्ण वाढीची संख्या अधिक असली तरी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे आज 106 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे आजपर्यंत बरे झालेल्याची संख्या हजारी पार झाली आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे

बीड जिल्ह्यात 2319 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये 969 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या 1271 रुग्ण उपचार घेत असून आज 106 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे नागरिकांनी आता सूचनांचे पालन करावे आणि कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यात 11 ठिकाणी रुग्णालयात बाधितांचा उपचार सुरू आहेत यातील बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेली असल्यामुळे तेही लवकरच बरे होऊन घरी जातील त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी काहीशी कामाला येत आहे वाढत असलेला संसर्ग देखील कमी होऊ लागला आहे