बीड

बीड जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी नागरिकांसाठी कार्यक्रम घेण्यास मनाई–जिल्हाधिकारी राहूल रेखावार


बीड, दि, 11 :- (जि. मा. का. ) महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 32 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम 144 (1( (3) लागू करण्यात आले असून या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थाना स्थळे, धार्मिक परिषदा, संमेलने, जमाव तसेच सार्वजनिक स्थळावर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतीक, राजकिय इत्यादी कार्यक्रमांवर महाराष्ट्र शासनाने संदर्भिय आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला असल्याचे मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यात श्रावण मासामध्ये सण उत्सव गोकुळ आष्टमी, गोपाळकाला, पतेती, पोळा गणेश उत्सव, ऋषी पंचिमी यासारखे सार्वजनिक सण उत्सव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरे करण्यास शासनाने याविषयी विशेष परवानगी दिली नसल्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. अपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत