कोविड सेंटरसाठी डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर.
खाजगी रुग्णालयात एंटीजन टेस्ट करून नॉन कोविड रुग्णांवर उपचार होणे गरजेचे.
बीड दि. ९ (प्रतिनिधी) :- सध्या बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि कोविंड सेंटरमध्ये डॉक्टर्स नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे यासाठी या नियुक्त्या तातडीने होणे गरजेचे आहे, गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात टेस्ट साठी पाठवले जाते तेथून रिपोर्ट येण्यास उशीर होतो त्यामुळे खासगी रुग्णालयातच दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांची त्याच ठिकाणी एंटीजन टेस्ट करून त्यांच्यावर उपचार करण्यास तात्काळ परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे गेल्या काही दिवसात अँटिजेंन टेस्ट केल्यानंतर आणखीन रुग्ण संख्या वाढली आहे मात्र सरकारी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नर्स आणि अन्य काम कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे यासाठी या ठिकाणी आवश्यक तो कर्मचारी वर्ग तातडीने नियुक्त करणे गरजेचे असून खाजगी डॉक्टरांना दुर्धर आजाराचे पेशंट तपासण्यासाठी त्यांच्याच रूग्णालयात अँटिजेंन टेस्ट करून लगेच रुग्णावर उपचार करण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे कारण लोकांमध्ये आता प्रचंड घबराट पसरली असून आधीच आहे त्या व्याधीने रुग्ण त्रस्त असून यात रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयात 100 अँटिजेंन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून खाजगी रुग्णालयात दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातील
खाजगी रुग्णालयात अँटिजेंन टेस्ट किट उपलब्ध करून देणे,त्याच ठिकाणी टेस्ट करून उपचार होणे,कोविड सेंटर मध्ये आवश्यक तो स्टाफ तातडीने नियुक्त करणे आदी प्रमुख मागण्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत