SBI ने सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन पद्धत: वाचा काय आहे प्रकार
मुंबई :स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने आपल्या ४२ कोटी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक मोठी सुविधा सुरु केली आहे. या वाया सुविधेमुळे ग्राहकांच्या व्यवहार सुरक्षित होतील. आता तुम्ही SBIच्या ATM मध्ये गेल्यावर 10 हजार रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम काढत असेल, तर त्याला ओटीपी विचारण्यात येईल. SBI ने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पैसे काढताना जो ओटीपी येईल तो तुमच्या बँकेत रजिस्टर्ड असणाऱ्या नंबरवर येईल.
का केली आहे हि सुविधा :-
डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना फसवले जाते.
एटीएमच्या माध्यमातून क्लोनिंगचा वापर करत ग्राहकांची माहिती चोरी केली जाते.
गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम एसबीआयची आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसबीआय आपल्या ग्राहकांना फसवणूक होऊ नये म्हणून नेहमीच सूचना देताना दिसत आहे.
ग्राहकांना अलर्ट पाठवणारे काही ट्वीट एसबीआयकडून शेअर केले जातात.तुमचे खाते, बँंकिंग व्यवहार आणि वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी माणसाला देऊ नये, याबाबत एसबीआयकडून वारंवार सूचित करण्यात येते. त्याचप्रमाणे एसबीआयकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जात आहे.