बीड

बीडमध्ये दिवसभरातअँटिजेंन टेस्ट मध्ये आढळले 86 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली.दिवसभरात 2601 दुकानदार/व्यापारी/कामगार यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 86 जण पॉझीटीव्ह आढळून आले. शहरातल्या 6 केंद्रावर तपासणी झाली आहे.

बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी शहरात भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतला. शहरातील जे काही व्यापारी किरकोळ विक्रेते, दुकानावर काम करणारे कामगार आणि दूध व्यवसायिक यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज (दि.8)सकाळपासून 6 केंद्रावर टेस्टला सुरूवात झाली. आज दिवसभरात 2601 जणांची तपासणी केली असून यामध्ये 86 पॉझीटीव्ह आढळून आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *