बीड

चिंताजनक:तीन दिवसात 10 कोरोना बाधितांचा मृत्यु

बीड जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना बाधित असलेले आणि इतर आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्यादेखील वाढत आहे गेल्या तीन दिवसात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे

बीड जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झालेला असतानाच शुक्रवारी (दि.7) आणखी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंच्या एकुण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 49 झाली आहे.

मृत्यूचा ही आकडा वाढू लागला शुक्रवारी बीड शहरातील मोमीनपुरा भागातील 75 वर्षीय व्यक्ती, कामखेडा (ता.बीड) येथील 45 वर्षीय व्यक्ती तसेच सेलू (ता.गेवराई) येथील 65 वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय धारूर येथील 70 वर्षीष व्यक्तीसह अंबाजोगाईतील 2 वृध्द रुग्णांचा अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढू लागल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता 1381 इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *