महाराष्ट्रमुंबई

पोस्टाच्या या योजनेमुळे आपले वारसदार होऊ शकतात करोडपती

मुंबई : नागरिक आपल्याकडील पैसे एखाद्या योजनेत किंवा बँकेतील एफडीमध्ये गुंतवणूक ठेवतात. या गुंतवणुकीचा फायदा नागरिकांना अडचणीच्या काळात होतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत बँकांमधील आणि एफडीवरील व्याज दरात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत पैसे कोणत्या योजनेत किंवा कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण काळजी करु नका पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. इतकेच नाही तर तुम्ही कोट्याधीश सुद्धा बनू शकता. पोस्टातील अशीच एक योजना म्हणजे टाइम डिपॉझिट स्कीन आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) ही स्कीम इंडिया पोस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांपैकी एक प्रसिद्ध गुंतवणूक योजना आहे.

ही योजना सर्वांसाठी खुली आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किम ही देशातील ग्रामीण आणि दुर्गभ भागात खूपच लोकप्रिय आहे.

पोस्टाच्या योजनेने होऊ शकता करोडपती

ज्याप्रमाणे बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी करण्याची योजना आहे त्याचप्रमाणे, पोस्टात टाइम डिपॉझिट म्हणेजच टीडी योजना आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त किती रुपयांची गुंतवणूक करायची याची कोणतीही मर्यादा नाहीये. या योजने अंतर्गत पाच वर्षांच्या ठेवींवर ६.७ टक्के दराने वार्षिक व्याज मिळतो. जर तुम्ही या योजनेत प्रति वर्ष १२,५०० रुपये जमा करता तर २६ वर्षांनी तुमच्या अखाऊंटमध्ये १ कोटी रुपये जमा होतील. यासाठी तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागले आणि ते म्हणजे ५ वर्षांनी टाइम डिपॉझिटचा कालावधी पूर्ण झाल्यावर ती पूर्ण रक्कम पुन्हा एकदा टाइम डिपॉझिटमध्येच जमा करा. अशआ प्रकारे तुम्ही २६ वर्षांत करोडपती बनू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट स्कीमवर व्याज दर

भारतीय अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीला या योजनेवरील व्याज दराचा आढावा घेतं. हा व्याज दर सरकारी सिक्युरिटीजच्या नफाच्या आधारे निश्चित केले जातात आणि सामान्यत: ते सरकारी क्षेत्राच्या नफ्यावर असतात. पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिटमध्ये पैसे जमा केल्यास इन्कम टॅक्समधून सूटही मिळते. नवे व्याज दर १ जुलै २०२० पासून लागू होतात. प्रत्येक तीन महिन्यांची पुनरावलोकन केले जाते. व्याज दराची पुढील घोषणा आता १ ऑक्टोबर २०२० रोजी केली जाईल.

एका वर्षाच्या पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर ५.५ % व्याज मिळतो.
दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर ५.५ % व्याज मिळतो.
तीन वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर ५.५ % व्याज मिळतो.
पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर ६.७ % व्याज मिळतो.
टाइम डिपॉझिट योजनेचे फायदे

पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास हमी परतावा मिळतो. ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर ८० सी अंतर्गत इन्कम टॅक्सवर सूट मिलते. या योजनेत तुम्ही कमीत कमी २०० रुपये गुंतवणूक करु शकता आणि गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा नाहीये. ही ठेव तुम्ही १, २, ३ किंवा ५ वर्षांसाठी करु शकता. स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे तुम्ही खाते उघडू शकतात. मुदत संपल्यानंतर तुम्ही आपल्या ठेवींची मुदत वाढवू शकता. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते हस्तांतरित करता येऊ शकते. वेळेपूर्वी तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. मात्र, त्यावेळी तुम्हाला व्याज दर हा कमी मिळेल.

अकाऊंट सुरू करण्यासाठी वयोमर्यादा

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये अकाऊंट सुरू करण्यासाठी कमीत कमी १० वर्षे वय असावे. अल्पवयीन मुले सुद्धा गुंतवणूक सुरू करु शकतात. कुणीही पालक अल्पवयीन मुलाच्या वतीने पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकतो. अनिवासी भारतीयांना या योजनेअंतर्गत खाते उघडण्याची परवानगी नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *