बीड शहरात अकरा ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून संचारबंदी घोषित
बीड शहरात दिनांक 4 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून याठिकाणी प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून कंटेनमेंट झोन जाहीर करावा असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी सादर केल्यामुळे बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144( 1)( 3) नुसार बीड शहरातील संस्कार कॉलनी गयानगर गोविंद नगर धानोरा रोड, चंपावती नगर, (जय महाराष्ट्र हॉटेल मागची बाजू) भाग्यनगर (पारनेरकर मंदिराच्या पाठीमागे ) पोस्टमन कॉलनी, बुद्ध विहार च्या बाजूला खासबाग शिवाजीनगर (के एस के कॉलेज जवळ) दिलीप नगर, इंडिया बँक कॉलनी, नेत्र धाम परिसर, विप्र नगर, या ठिकाणी रुग्णाच्या घरापासून काही अंतरावर होते कंटेनमेंट झोन घोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे
अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी हे आदेश जारी केले आहे