लक्षणे नसलेली 202 रुग्ण तर बरे झाले 463:आज 56 पॉझिटिव्ह
आज दि 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या स्वॅब च्या तपासणीचा अहवाल आला असून यामध्ये जिल्ह्यात 56 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
कोरोना बाबत जनतेमध्ये भीतीचे वातावरण असतानाच बीड जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 202 रुग्ण ही लक्षणे नसलेली आहेत तर सौम्य लक्षण असलेले रुग्ण 152 आहेत मध्यम लक्षण असलेले रुग्ण 44 आहेत एकूण 902 रुग्णांपैकी 463 रुग्ण बरे झाले आहेत केवळ 11 जणांचीच परिस्थिती गंभीर आहे बाकी सर्व उपचार घेत असलेले 409 रुग्ण उपचार घेऊन बरे होतील अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात ठिकाणी उपचार घेत असलेल्या या रुग्णांवर आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून असून बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 16 हजार 39 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी पंधरा हजार 137 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत