बीडमध्ये आता खर्या लॉक डाऊनची गरज
बीड
बीड शहरात दिवसेंदिवस कोरोना उद्रेक सुरू झाला आहे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक आता मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले आहेत बीड शहरात आता खऱ्या लॉक डाऊन ची गरज असल्याचे मत आता नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे जेव्हा काहीच रुग्ण नव्हते तेव्हा लॉक डाऊन पाळला गेला परंतु लॉक डाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे एवढेच काय तर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा देखील बळी जात आहे बीड जिल्ह्यात तब्बल 17 लोकांचा बळी घेतला आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आता कुठलाही विचार न करता उद्यापासून 31 जुलैपर्यंत कडक संचार बंदी लागू करून लॉक डाऊन जाहीर करावा जेणेकरून संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल असे मत आता नागरिकांमधूनच व्यक्त केले जात आहे बीड शहराला आता खऱ्या लॉक डाऊन ची गरज असून ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतो तो भाग बंद केल्याने रुग्ण संख्या कमी होईल असे वाटत नाही त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदीची खरी गरज आहे