बीड जिल्ह्यातील दोन कोरोना ग्रस्तांचा मृत्यु: आकडा १६ वर
बीड- सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेख अब्दुल जब्बार फरीद, वय अंदाजे ४७ वर्ष यांचे आज निधन झाले आहे. दरम्यान जब्बार हे १२ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर परळी वैजनाथ, सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेख अब्दुल जब्बार फरीद वय अंदाजे ४७ वर्ष यांचे आज निधन झाले आहे. दरम्यान जब्बार हे १२ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर प्रथम अंबाजोगाई आणि नंतर संभाजीनगर येथे रूग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. शेख यांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून परळी तालुक्यात हा दुसरा मृत्यू असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रूग्णाच्या संपर्कात आले होते.
दिवसेंदिवस कोरोना संसर्गाने परळी तालुक्यात पाय पसरले असून यापूर्वी एका महिलेचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथे मृत्यू झाला असून सदर महिलाही कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले होते. आज पुन्हा सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेचे शिक्षक शेख अब्दुल जब्बार फरीद हल्ली मुक्काम रा.पेठ मोहल्ला परळी वैद्यनाथ (मुळचे गंगाखेड, जि.परभणी येथील रहिवासी) यांच्यावरही कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पाश्र्वभूमीवर प्रथम अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परळी शहरात विशेषतः शिक्षक वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गेवराई येथील कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा जसा झपाट्याने वाढत आहे तसाच मृत्यूचा आकडाही वाढताना दिसत असून १८ जूलै रोजी अत्यावस्थेत असलेली गेवराई येथील महिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता आज सदरची महिला कोरोनाबधीत आढळून आली. त्याच महिलेचा मृत्यू झाला असून गेवराई शहरात गेल्या दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
गेवराई शहरातील माळी गल्ली येथील एका ३२ वर्षीय महिलेला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला कोरोनाचे लक्षणे असल्याने तिचा स्वॅब घेवून जिल्हा रूग्णालयातील कोरोनासेंटरमध्ये घेण्यात आले होते. आज सकाळी आलेल्या २४ पॉझिटिव्हमध्ये त्या ३२ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आलाहोता. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आतापर्यंत बीड जिल्ह्यात १३ जणांचा तर जिल्हाबाहेरील दोघांचा अशा १५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची नोंदआहे.