कोरोना बाधीत संख्या वाढू लागली:आज 11 पॉझिटिव्ह,परळीला धक्का
कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅ ब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या आज 11 पॉझिटिव्ह आढळून आले असून आज पुन्हा बीड शहरात 3 अधिक रुग्ण आढळले आहेत तर परळीत 5 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत
काल गुरुवारी तब्बल 40 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 313 झाली आहे तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 7872 लोकांचे सॅम्पल तपासणीसाठी घेतल्यानंतर 7266 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 302 पॉझिटिव्ह आले आहेत तर इन्कनक्लुजीव 229 आहेत नाकारण्यात आलेले 15 आहेत,बाधीत असलेले 15 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत
बीड आणि परळी शहरात सामूहिक संक्रमण थांबवण्यासाठी आरोग्य खात्याकडून दखल घेतली जात आहे ज्या भागामध्ये बाधित रुग्ण आढळत आहे त्या भागातील नागरिकांचे सॅम्पल घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे या तपासणीमध्ये बाधित रुग्ण आढळू लागले आहेत बीड जिल्ह्यात सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 160 झाली आहे