बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. हिंगोली येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आज आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही वर्गाचे निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.