पुणेमहाराष्ट्र

पुण्यात पुन्हा 15 दिवसाचा कडक लॉकडाऊन

पुणे: करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस पुणे बंद राहणार आहे.
सुमारे ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकला सुरुवात केली होती. तेव्हापासून सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केले जात आहेत. मात्र, लॉकडाऊन जसजसे शिथिल होत आहे, तसतसे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातही रुग्ण वाढीचं प्रमाण मोठं आहे. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याआधी वेळोवेळी दिला होता. त्यानंतरही लोकांचं विनाकारण फिरणं थांबलं नाही. त्यातून संसर्गाचा धोका वाढला. तो आणखी वाढू नये म्हणून अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
कारवाईचा धडाका
लॉकडाऊन सुरू होण्याआधीच पुणे पोलिसांनी कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरुन संचार, पदपथावरुण वाहन चालवणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी २७८ अधिकारी आणि ११९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *