‘या’ राज्याने घेतला एक वर्ष “सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचा निर्णय
तिरुअनंतपुरम – केरळ या राज्यात जुलै 2021 म्हणजे एका वर्षापर्यंत मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळणे बंधनकारक असणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
विवाहास्थळी फक्त 50 लोकांनाच परवानगी असेल. अत्यंविधी वेळी फक्त 20 लोकांनाच परवानगी असेल. तर दुकान आणि व्यापर अशा ठिकाणी केवळ 25 लोकांनाच परवानगी असेल. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल.
केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये तिसरा लॉकडाऊन सोमवारी सकाळपासून सुरू केला आहे. पुढील आठवड्यापर्यंत सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोमवार सकाळपासून कुणीही घराबाहेर गरज नसताना जीवनाश्यक वस्तू आणि भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडू नये. पोलीस मुख्यालय, रुग्णालये, मेडिकल शॉप्स आणि बॅंक सोडून इतर सर्व कार्यालये तिरुअनंतपुरममध्ये पुढील एका आठवड्यापर्यंत बंद राहणार आहेत.
करोना विषाणू पार्श्वभूमीवर केरळ राज्याने हे कडक पाऊल उचलले आहे.