बीड

बीडमध्ये सव्वा लाख लोकांची आरोग्य तपासणी: 210 संशयितांचे स्वॅब तपासणार-डॉ पवार

बीड । वार्ताहर
बीड शहरात कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी 8 दिवस शहर बंद करुन पहिल्या टप्प्यात पेठ बीड व मोमीनपूरा आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या 1 लाख 10 हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे काम हाती घेण्यात आले या तपासणीत 6 हजार नागरिक हे कोमॉर्बिडी गटात येणारे आढळून आले आहेत
शहरातील मेगा आरोग्य सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून हाती घेतले असून दोन टप्प्यात अडीच लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण होणार असून पहिल्या टप्प्यात 210 संशयित लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे

पहिल्या टप्प्यात मोमीनपुरा आरोग्य केंद्र व पेठ बीड आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या भागात सर्वेक्षण होत आहे. यामध्ये मोमीनपुर्‍यात 11 हजार 787 कुटुंबातील 58 हजार 818 नागरिकांचे 59 पथकांकडून सर्वेक्षण केले गेले यात, सर्दी ताप असलेले 49, बाहेरगावाहून आलेले 34, होम क्वारंटाईनचे स्टिकर लावलेले 16 तर ऑक्सीजन पातळी तपासलेले 1200 नागरिक होते. तर 2 हजार 108 नागरिक हे कोमॉर्बिडीज म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग अशा गटातील समोर ओल शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी असलेले 8 जण सापडले आहे तर, पेठ बीड विभागात 10 हजार 318 कुटुंबातील 51 हजार 783 नागरिकांचा सर्वे 53 पथकांच्या माध्यमातून केला गेला.
यात, सर्दी ताप खोकल्याचे 31, बाहेरगावाहून आलेले 110, होम क्वारंटाईनचे स्टिकर असलेले 38, शरिरातील ऑक्सिजन पातळी तपासलेले 3 हजार 23 तर कोमॉर्बिडी गटातील 3 हजार जण आढळून आले यात, शरिरातील ऑक्सीजन पातळी कमी असलेले 4 जण आढळले आहेत. दोन्ही विभाग मिळून एकूण 22 हजार 105 कुटुंबातील 1 लाख 10 हजार 601 नागरिकांचे सर्वेक्षण 112 पथकांकडून केले गेले आहे. यात 80 जण सर्दी खोकल्याचे रुग्ण, 144 बाहेर गावाहून आलेले होते एकूण 4 हजार 223 जणांची पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी झाली तर 5 हजार 108 जण कोमॉर्बिडीटी गटातील रुग्ण समोर आले. या सर्वेक्षणातून आतापर्यंत 210 संशयितांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे डॉ पवार यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *