बीड शहरातील दोन गल्ल्या आणि आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे संचारबंदी लागू- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड
बीड जिल्ह्यात आज 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे 3 रुग्ण आढळून आले असून बीड शहरातील दत्त मंदिर गल्ली समोरील गल्ली आणि अजीज पुरा याठिकाणी 2 रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करून अनिश्चित कालावधीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संचारबंदी लागू केली आहे
आज बीड जिल्ह्यातून सर्व 37 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आष्टी तालुक्यातील शिर्डी या ठिकाणी तीन रुग्ण तर बीड शहरातील अजीज पूरा आणि दत्त मंदिर समोरील गल्ली या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण असे 5 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे कंटेनमेंट झोन घोषित करून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर बीड शहरातील अजीतपुरा आणि दत्त मंदिर समोरील गल्लीत अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत