बीड

प्रशासनाचा भोंगळ कारभार दत्तनगरमध्ये भीतीचे वातावरण


बीड
कोरोना बाधित रुग्ण आढळले याचा अहवाल देत असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे तो बीड शहरातील रुग्ण चुन गल्ली या ठिकाणी आढळून आला मात्र तो रुग्ण दत्तनगर भागातील असल्याचे सांगितल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बातम्या आल्यानन्तर अनेक फोन पत्रकारांना विचारणा करण्यासाठी येत होते मात्र माहिती घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळून आलेला हा रुग्ण चुनगल्ली या ठिकाणचा असल्याचे स्पष्ट झाले आहे या रुग्णाचा दत्त नगर किंवा दत्त मंदिर गल्ली याच्याशी कसलाही संबंध नाही मात्र प्रशासनाने नोंद करताना दत्तनगर अशी नोंद केल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे दुसऱ्यांच्या झालेल्या चुकांवर प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जाते आता प्रशासनाकडून जर चुका होत असतील तर यावर कोणी कारवाई करायची असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तरी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे आरोग्य विभागात चाललेल्या भोंगळ कारभारामुळे बीड शहरात आणि जिल्ह्यात संभ्रमावस्थेत चे वातावरण निर्माण झाले आहे
आज आढळून आलेला रुग्ण हा चुन गल्लीतील असून दत्त नगर मधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये घरीच राहा सुरक्षित राहा असे आवाहन नगरसेवक विनोद मूळूक यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *