Uncategorized

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी

बारामती (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील आधार फाउंडेशनच्यावतीने ढेकळवाडी , सोनगाव ,झारगडवाडी, डोरलेवाडी तसेच सपकळवाडी या पाच गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी करण्यात आली.

कोरोना जंतूसंसर्ग आजार असून जवळजवळ दोनशेहून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झालेला आहे . सामाजिक बांधिलकी जपत ढेकळवाडी येथील आधार फाउंडेशन च्या वतीने  गावात स्वखर्चातून जंतुनाशक औषध फवारणी केली.

पाच गावात पाच दिवस हा उपक्रम राबविला . गावातील मुख्य ठिकाणे ,आठवडे बाजार ,प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, जास्त लोकसंख्येच्या वाड्या-वस्त्या याठिकाणी फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच बाळासाहेब बोरकर, नवनाथ सोलंकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिलावर शेख, पोलिस पाटील चेतन ठोंबरे , ग्रामसेवक सतिश गायकवाड, ढेकळवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी भागवत हांडे तसेच पोपट गरदडे यांचेही सहकार्य मिळाले. अशा पद्धतीचा उपक्रम आपल्या गावामध्ये प्रत्येकाने राबवावा त्यामुळे शासनाचा वेळ आणि खर्च वाचेल त्यातून निश्चितच कोरोनचा प्रादुर्भाव होणार नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच घरातून बाहेर पडू नये असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाचक यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *