देशनवी दिल्ली

तुम्ही UPI पीनचा वापर करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात डिजिटल व्यवहारांना भारत सरकार आणि आरबीआय प्रोत्साहन देत आहे. 2021 पर्यंत देशातील डिजिटल व्यवहारात चारपट वाढ होण्याची अपेक्षा आहे. डिजिटल व्यवहारासाठी भारतातील लोक यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इटरफेसचा वापर करत आहे. यूपीआयच्या माध्यमातून दरमहा लाखो रुपयांचा व्यवहार केला जात आहे. मात्र, यूपीआय किती सुरक्षित आहे हा प्रश्न आहे. लोकांसाठी डिजिटल व्यवहार जसा फायदाचा आहे तसा धोकादायक देखील आहे.

देशात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स रोज नवीन पद्धत वापरत आहेत. दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना समोर येत असून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये लोकांच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये परस्पर काढले जात आहेत. यामुळे सुरक्षित देवाण-घेवाण करण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही.
केवळ सुरक्षित अॅप्लिकेशनवरच यूपीआय पिन वापरा काही अॅप्लिकेशनमुळे आपली खासगी माहिती आपल्या फोनद्वारे मिळवली जाऊ शकते. यामध्ये तुमच्या देवाण घेवाणीची माहितीचा समवेश असतो. त्यामुळे अशा अॅप्लिकेशन पासून सावध रहा. आपला यूपीआय पिन सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा फसवणूक होऊ शकते. फसवणूक टाळण्यासाठी शक्यतो भीम अॅपवरच आपल्या यूपीआय पिनचा वापर करा. जर एखाद्या वेबसाईटने किंवा फॉर्ममध्ये आपल्याला यूपीआय पीनचा उल्लेख करण्यास सांगितले जात असेल, किंवा एखादी लिंक तुम्हाला दिली जात असेल तर यापासून सावध रहा. तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

फक्त पैसे पाठवण्यासाठीच यूपीआयचा पिनचा वापर करा
आर्थिक व्यवहार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तिला पैसे पाठवायचे आहेत, त्याचवेळी यूपीआय पिनचा वापर करा. जर तुम्हाला कुठून पैसे मिळत असतील आणि आपल्याला यूपीआय पिन विचारला जात असेल तर जाणून घ्या की फसवणूक होऊ शकते.

कस्टमर केअरशी संपर्क साधा

जर व्यवहार करताना तुम्हाला कोणती अडचण येत असेल आणि आपल्याला ग्राहक सेवाशी संपर्क करायचा असेल, तर फक्त पेमेंट अॅप्लिकेशनचा वापर करा. इंटरनेवर देण्यात आलेल्या फोन क्रमांकाशी संपर्क साधू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *