जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटी पार
जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 74 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 529,577 रुग्ण आहेत. तर 16,103 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 203,328 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 310,146 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 19,906 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.