देशनवी दिल्ली

‘कोरोनिल’ची जाहिरात थांबवा, आधी सविस्तर माहिती द्या; केंद्राचा पतंजलीला दणका

नवी दिल्ली, 23 जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

पंतजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केलं. या औषधाचा वैज्ञानिक अभ्यास, चाचणी करण्यात आल्याचं पतंजलीने सांगितलं. मात्र याबाबत आयुष मंत्रालयाला काहीच माहिती नाही. त्यामुळे याची सविस्तर माहिती आधी आयुष मंत्रालयाला द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवावी असं आयुष मंत्रालयाने (Ayush ministry) म्हटलं आहे.

ANI@ANI

Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till issue is duly examined: Ministry of AYUSH४,२९५Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *