औरंगाबादबीड

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित महिलेचा औरंगाबादेत मृत्यू


बीड जिल्ह्यातील परळी येथील 57 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली होती या महिलेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे दोन दिवसापूर्वीच केज तालुक्यातील एका महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता बीड जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे
सदरील महिलेस मधुमेह किडनी निमोनिया असे आजार होते उपचारासाठी गेल्यानंतर या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता बीड जिल्ह्यात काल आढळलेल्या पाच कोरोना बाधित रुग्णां मुळे 95 रुग्णसंख्या झाली आहे यामध्ये 71 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *