बीड

कार मोटार सायकल अपघातात तीन जण ठार:मसेवाडी जवळ घटना

लग्न समारंभ उरकून गावाकडे मोटर सायकलवर जात असताना स्विफ्ट कारच्या धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना लिंबागणेश जवळ मुळूक नजीक घडली आहे

गोरख बबन मोरे आणि बंकट बाबूराव मोरे हे लग्न समारंभांवरून मोटार सायकल वरुन गावी मसेवाडी येथे परत येत होते. लिंबागणेश याठिकाणी संजय बाळु सोनावणे यांची भेट झाली. चहापाणी झाल्यावर तिघेही एकाच मोटार सायकल वर बसुन मसेवाडी कडे निघाले वेळ दुपारी पावने दोन च्या सुमारास मुळुक गावाजवळ पुलाजवळ बीड येथुन पांढ-या स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली. यात स्विफ्ट कार दोन पलटी खाऊन रस्त्याच्या बाजुला पडली. मोटार सायकल वरील बंकट बाबुराव मोरे व संजय बाळु सोनावणे जागीच ठार झाले.तर तिसरा गोरख मोरे यास गंभीर अवस्थेत लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठीकाणी तपासणी केल्यानंतर डॉ.रूपाली राऊत वैद्यकीय अधिकारी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी जखमी गोरख बबन मोरे यांना मृत घोषित केले.घटना स्थळावर नेकनुर पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि त्यांची टीम व लिंबागणेश येथिल पोलिस चौकीतील कर्मचारी उपस्थित होते.सध्या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमच्या तयारीत आहेत. सध्या पोलीस कर्मचारी मृत व्यक्ती वरील जखमा आदि.ची नोंद करत आहेत.स्विफ्ट गाडीतील दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने नेकनुर पोलिस ठाणे येथे त्यांना नेण्यात आले आहे.
१) गोरख बबन मोरे वय ३० वर्ष अविवाहित , व्यवसाय शेती पश्चात आई वडील, १भाऊ ,१ बहिण
२) बंकट बाबूराव मोरे वय ५० वर्षे विवाहित
१ मुलगा व १ मुलगी त्यांची लग्न झालेली आहेत
वडील आहेत,आई हयात नाही.
३) संजय बाळु सोनवणे वय ४० वर्षे विवाहीत २ मुली
वय ११वर्षे आणि ७ वर्षे
१ मुलगा बालवाडीत असा त्यांचा परिचय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *