पालकमंत्री किंवा पी ए यांच्या संपर्कात आलेल्यानी त्वरित रुग्णालयाशी सम्पर्क करावा-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड
ज्या व्यक्ती मागील चार दिवसांत पालकमंत्री त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे पी.ए. यांच्या जवळच्या संपर्कात आल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली अशांनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत २८ दिवस होम क्वाॅरंटाइन होऊन काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात संपर्क साधावा”असे आवाहन -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे मुंडे त्यांचे स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे महत्त्वाचे म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्यांनी किंवा कागदपत्राची देवाण-घेवाण केलेल्या नागरिकांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी संपूर्ण कुटुंबासमवेत होम कॉरणटाईनची कडक अंमलबजावणी करावी आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य सुविधांना कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे