झमझम कॉलनीतील आणखी एक रुग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला
बीड
काल बुधवारी बीड जिल्ह्यातून एकाच वेळी 130 जणांचे स्वॅप अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 103 जणांचे रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाले बीड शहरात मसरत नगर भागातील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 27 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत तर शंभर जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर बीड शहरात आणखी एक रुग्ण काल पुणे येथे कोरोना बाधित आढळून आला आहे एकाच दिवशी चार रुग्ण कोरोना बाधित आढळल्यामुळे बीड शहराचे टेन्शन आता वाढले आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 80 वर पोहोचली आहे
काल बुधवारी जिल्हाभरात 130 जणांचे तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार बीड शहरातील मसरत नगर भागात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले माजलगाव येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये आंबे वडगाव येथील रुग्णांनी उपचार घेतले होते त्यामुळे तेथील डॉक्टरांसहित 28 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते बीड शहरातील झमझम कॉलनीतील एक चालक हैदराबाद येथून आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळून आला होता विशेष म्हणजे तो ज्यांना घेऊन गेला ते तिघे जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यातील एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून मसरत नगर येथील या तीन रुग्णामुळे बीडकरांची धाकधूक वाढली आहे या रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या 57 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते शहराच्या मसरत नगर भागातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील तिघेजण आढळून आल्यानंतर झमझम कॉलनी येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेला आणखी एक रुग्ण पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आला आहे एकाच दिवशी बीड जिल्ह्यातील चार जण कोरोना बाधित आढळले आहेत प्रलंबित असलेल्या 27 जणांचे अहवाल आज प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे जिल्ह्यात आतापर्यंत 80 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील दोन जण मयत आहेत तर 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सोळा जण उपचार घेत असून यापैकी दोघांवर औरंगाबाद तर एकावर पुण्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे उद्या उपचार घेऊन बरे झालेल्या 3 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे धारूर,बीड व गेवराई येथील हे रुग्ण आहेत