देशनवी दिल्ली

मोठी बातमी! शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार

नवी दिल्ली, 10 जून : कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा शाळा महाविद्यालयं सुरु करण्याच्या दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहे. केंद्र सरकारनं (NCRT) पालन आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं या संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गाड्यांसारखाच आता वर्गात आणि विद्यार्थ्यांसाठी सम-विषमचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार शाळा उघडल्यानंतर सम-विषम रोलनंबरच्या आधारे करण्यात येईल. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येईल. शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतरानं विद्यार्थ्यांना वेळा ठरवून दिल्या जातील त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल. तर बंद खोलीत तास घेण्याऐवजी मोकळ्या जागेत किंवा मोकळ्या वर्गात शिकवण्याची शिफरसही करण्यात आल्याचं या गाइडलाइन्समध्ये शिफारस करण्यात आली आहे.

6 टप्प्यात सुरू होणार शाळा-महाविद्यालयंपहिल्या टप्प्यामध्ये 11 वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत

त्यानंतर 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू कऱण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात 2 आठवड्यांनंतर 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील.

-तीन आठवड्यांनंतर चौथ्या टप्प्यात 3री ते 5वी वर्ग सुरू करण्यात येतील.पाचव्या टप्प्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

5 आठवड्यांनंतर सहाव्या टप्प्यात नर्सरी आणि केजीचे वर्ग परवानगी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येतील. रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील वर्गमात्र ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहणार आहेत.

शाळांसाठी विशेष गाइडलाईन असणार

6 फूटांचं अंतर आणि सोशल डिस्टन्सचं पालन करणं बंधनकारक
एका वर्गात 30 ते 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असू नयेत.
वर्गाचे दारं-खिडक्या उघड्या असाव्यात. सम-विषम रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं.

विद्यार्थ्यांच्या जागा बदलू नयेत. रोज त्यांना गृहपाठ देणं आवश्यक आहे.
शाळेत प्रवेश केल्यानंतर स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन सर्व प्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे.
शाळेतील सर्व गोष्टी, खाण्याचे पदार्थ विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत घेऊन यावेत. कोणालाही शेअर करू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *