करोनामुळे तरुणांना हृदयविकाराचा धोका
नवी दिल्ली – तरुणांना करोना विषाणूमुळे हृदयविकाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालातून असे स्पष्ट केले आहे की, 30 ते 40 वर्षे असलेल्या युवकांना तीव्र हृदय विकाराचा झटका येत आहे.
करोना संसर्ग होण्याअगोदर या युवकांमध्ये हृदयविकार नव्हता मात्र, करोना झाल्यानंतर त्यांना हृदय विकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. संशोधनकर्त्यांनी 20 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान 14 संसर्ग झालेल्या रुग्णांवर संशोधन केले.
यात त्यांनी हृदय विकार झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. हे सर्व 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे हाते. यात आठ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. यातील निम्म्या व्यक्तींना माहीत नव्हते की त्यांना करोना संसर्ग आहे. हे रुग्ण वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात आले होते. तिथे त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. लक्षण नसलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने ही नवीन समस्या निर्माण झाल्याचे आढळून आले आहे.