इंडिया नावाला विरोध करणारी याचिका फेटाळली
नवी दिल्ली: देशाच्या घटनेतील इंडिया या नावाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून याबाबत केंद्र सरकारकडे ही मागणी करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घटनेतील कलम 1 मध्ये देशाचे नाव इंडिया असे नोंदले आहे. त्यात बदल करुन भारत हेच नाव राहावे असी मागणी करणारी याचिका एका व्यक्तीने केली होती. या याचिकेची एक प्रत केंद्र सरकारकडे पाठवावी व त्यावर याबाबतची पुढील कारवाई संबंधित मत्रालय घेइल असेही ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, ती एक दिवसानंतर बुधवारी करण्यात आली. देशाचे नाव इंडिया नव्हे तर भारत असेच घटनेत नोंद केले जावे अशी मागणी करणारी ही याचिका दाखल करण्यात आली होती.
जर देशवासी आपल्या देशाला भारत असेच संबोधतात तर घटनेतही तशीच नोंद असावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ब्रिटीश राजवटीत देशाचे नाव इंडिया असे संबोधले जात होते. मात्र, आता नाव बदलून राष्ट्रीय हित जपावे असे मत याचिकाकर्त्याने व्यक्त केले होते.