स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा;महिनाभरातच मुहूर्त ठरणार
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात रखडलेल्या महाापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे आता लक्ष लागले आहे. मिनी विधानसभा निवडणुका कधी होणार, याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका असणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी कोट्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आपला निकाल याच महिन्यात सुनावण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचेनचा वादही सर्वोच्च न्यायालयात आहे. या याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टातील प्रकरण ही प्रकरणे जानेवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, शिर्डीत भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भाजपच्या बैठका पार पाडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सज्ज राहण्याची सूचना केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दृष्टीने तयारी करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.