महाराष्ट्र

आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा, दोन आरोपी ताब्यात

सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या घटनेबाबत ‘ प्रतिक्रिया दिली. “सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई प्रगती पथावर आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींबद्दल लवकरच स्पष्ट केले जाणार आहे. तसेच सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 16 पथक रवाना करण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही”, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?

“ही घटना गंभीर होती. या प्रकरणात प्राधान्यक्रम ठरवून पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस कर्मचारी तपासात व्यस्त आहेत. पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयांकडून 10 पथक आणि क्राईम ब्रांचकडून 6 पथक तयार करण्यात आले होते. हे सर्व पथक या प्रकरणात तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व प्रकारे मग ती टेक्निकल किंवा इतर असतील अशा सर्व अंगांनी तपास केलेला आहे. या तपासात पोलीस प्रगती करत आहेत”, असं सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *