निवृत्ती वेतनधारकांना आयकर कपात,हयातनामाबाबत कोषागार कार्यालयाचे आवाहन
बीड, दिनांक 3 (जिमाका) : ज्या निवृत्ती वेतनधारक यांना आयकर भरावा लागतो. परंतु त्यांचे अर्ज बचतीसह जिल्हा कोषागार कार्यालयात विहित मुदतीत प्राप्त होणार नाहीत, अशा निवृत्ती वेतनधारकाचा आयकर जिल्हा कोषागार कार्यालयात आयकर नियमावलीनुसार कपात करण्यात येईल. त्यामुळे बचतीचे विवरण पत्र, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक कोषागार कार्यालयास ३१.१२.२०२४ पर्यंत सादर करावे.
तसेच सन २०२४-२५ च्या हयातनाम्यासाठी ज्या बँकेत निवृत्ती वेतन घेत आहेत, त्या शाखेत जाऊन माहे नोव्हेंबर २०२४ अखेर सही, अंगठा केला नसेल, अशा निवृत्ती वेतनधारकांनी कोषागारात १५.१२.२०२४ पर्यंत न चुकता हयातनामा जमा करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ल. पां. गळगुंडे यांनी केले आहे.