महाराष्ट्र

संघ प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे झेड प्लस पेक्षा अधिक ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. काही दिवसांपूर्वीच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती.

मल्टी लेयर सुरक्षा प्रणाली

संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा आहे. आता त्यांना मिळणाऱ्या एएसएल या वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे.

कडक सुरक्षा प्रोटोकॉल

डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *