दहावीच्या निकालाची अपडेट;शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. याचेच उत्तर आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असेही सांगितले. दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या मदतीनेदेखील तुम्ही निकाल पाहू शकता.