ऑनलाइन वृत्तसेवा

पुन्हा कोरोनाचे टेन्शन वाढू लागले;600 हून अधिक नवे कोरोनाबाधित,दोन रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

देशात कोरोना व्हायरसचे 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याचं समोर आलं आहे. देशातील सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4054 झाली आहे, या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कर्नाटकात गेल्या 24 तासांत देशात 74 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यासोबतच दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.

घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. सुट्ट्यांमुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे घेतलेल्या निष्काळजीपणामुळे चिंत वाढली आहे. पार्ट्या आणि गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *