बीड

माजी केंद्रीय मंत्री,बीडचे माजी खा बबनराव ढाकणेंचं निधन

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन झालं असून ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते.

त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.

बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

माजी खा बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला.महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते.याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता.बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *