ऑनलाइन वृत्तसेवा

मराठ्यांचा एल्गार;आरक्षणासाठी माझी अंत्ययात्रा निघेल नसता विजयी यात्रा-मनोज जरांगे पाटील

सरकारला 10 दिवसाची मुदत

जालना/प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले.त्यांनी स्वतःहून उपस्थित लोकांना शांततेचे आवाहन केले आणि आज भाषण नाही फक्त म्हणणे समजून घ्या असे म्हणत आरक्षणासाठी माझी अंत्ययात्रा निघेल नसता विजयी यात्रा निघेल,सरकारला 10 दिवस आहेत आम्हाला आरक्षण जाहीर करा,ओबीसीतून कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे त्याशिवाय आता मराठा माघार घेणार नाही,मराठ्यांनी उद्रेक करू नये,हिंसक आंदोलन करू नये शांततेच्या मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे,असे सांगून त्यांनी उपस्थित जनसमुदायला बोली भाषेत आपली भूमिका सांगितली

महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत. आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आता मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

१. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा

२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी

३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी

४. दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो सर्व्हे करण्यात आलेला नाही. असा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात

५. सरकारने मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण द्यावे

६. सारथीमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.

७. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं की, ‘सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झालेत. आता १० दिवस सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे आता तात्काळ आरक्षण देण्यात यावे. चाळीस दिवसानंतर आरक्षण दिलं नाही तर काय ते तुम्हाला सांगू, मराठे अंगावर घेऊ नका. त्यांच्या विरोधात जाऊ नका.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *