ब्राह्मण समाजाच्या वतीने दि 26 रोजी (उद्या) बीडमध्ये धरणे आंदोलन
बीड(प्रतिनिधी) ब्राह्मण समाजा बद्दल महाराष्ट्रात सातत्याने गैर उद्गार काढण्याचे प्रकार वाढत आहेत. समाजातील एखादी व्यक्ती चुकीच्या पध्दतीने विधान करत असेल तर त्या व्यक्ती विषयी आक्षेप घेणे आवश्यक असताना जाणिवपुर्वक संपुर्ण ब्राह्मण समाजालाच दोष देणे, समाजा विषयी आक्षेपार्ह विधान करणे,समाजाची बदनामी करणे, या समाजाबद्दल इतर समाजात व्देष निर्माण होईल असे जाणिवपुर्वक प्रयत्न करणे. हे प्रकार सुरु आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह (धरणे)आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ब्राह्मण समाजाचे जेष्ठ नागरिक,माता,भगिनी,युवा, युवती या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाचे सर्व संपादक आणि पत्रकार करणार आहेत.या मध्ये नामदेवराव क्षीरसागर (संपादक),सर्वोत्तम गावरस्कर(संपादक),राजेंद्र आगवान (संपादक),अशोक देशमुख ( पत्रकार),प्रा.सतीश पत्की( पत्रकार),जगदिश पिंगळे ( पत्रकार),दिलीप खिस्ती(संपादक),संतोष मानूरकर (संपादक),महेश वाघमारे ( पत्रकार), प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर ( पत्रकार),लक्ष्मीकांत रुईकर ( पत्रकार),उदय जोशी ( पत्रकार),दिनेश लिंबेकर ( पत्रकार),मंगेश निटूरकर( पत्रकार),रविंद्र देशमुख (पत्रकार),प्रशांत सुलाखे (पत्रकार),प्रमोद कुलकर्णी (पत्रकार),सुशिल देशमुख( पत्रकार),अविनाश वाघीरकर (पत्रकार),अतुल कुलकर्णी (पत्रकार),अक्षय केंडे (पत्रकार),दिपक सर्वज्ञ (पत्रकार),अनिल महाजन(पत्रकार),अविनाश मुडेगावकर(पत्रकार),प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे (पत्रकार),सुधीर नागापुरे (पत्रकार),प्रदिप जोेशी (पत्रकार),स्वानंद पाटील (पत्रकार), नंदु पांडव(पत्रकार) आदिंचा समावेश आहे.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती विरुध्द नसून प्रवृत्ती विरुध्द आहे
ब्राह्मण समाजाच्या वतीने बीडमध्ये करण्यात येणारे आजचे आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती विरुध्द नसून प्रवृत्ती विरुध्द आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या वतीने हीच भूमिका अधोरेखित केली जाणार आहे की अलीकडच्या काळात आक्षेपार्ह विधान करण्याची स्पर्धा सुरु आहे. वेगवेगळ्या समाजातील लोक इतर समाजा बद्दल, धर्माबद्दल, महापुरुषांबद्दल ,देवी-देवतांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. या सर्व लोकांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे समाजात अशांतता निर्माण होणे. परंतु अशी वादग्रस्त विधाने करणार्या व्यक्तींच्या विरुध्द कठोर कायदेशिर कारवाई होण्या ऐवजी ती व्यक्ती ज्या जातीची किंवा धर्माची आहे त्या जातीला वा धर्माला दोष दिला जातो.ही पध्दत बंद झाली पाहिजे. प्रत्येक जाती,धर्मात काही विकृत लोक असतात. अशा लोकांचे प्रमाण अत्यल्प असते. परंतु तेच लोक संपुर्ण समाजात अशांतता निर्माण करतात. ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान करतात हा या समाजाचा दोष नाही. त्यामुळे अशा व्यक्तींच्या विरुध्द जरुर कायदेशिर कारवाई व्हावी. मात्र संपुर्ण समाजाला शिव्याशाप देणे बंद झाले पाहिजे. ही भूमिका घेवून ब्राह्मण समाज आज आंदोलन करत आहे.